Friday, May 22, 2026

पंप आहे साक्षीला ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
पंप आहे साक्षीला
पेट्रोल डिझेल साठी पंपा पंपावर,
गिऱ्हाईकांचे नॉक नॉक आहे.
तरीही दिलासा मिळत राहतो,
आपल्याकडे पुरेसा स्टॉक आहे.
इंधनाचा पुरेसा स्टॉक आहे,
हे कधीही सिद्ध झालेले नाही.
पेट्रोल डिझेल साठी मारामाऱ्या,
तरी बरे अजून युद्ध झालेले नाही.
ज्यांना सोसल्याशिवाय पर्याय नाही,
ते बिचारे टंचाईत सोशीत आहेत !
पंप आहेत साक्षीला,
आनंदात इथले स्टॉकिस्ट आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9284
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
22मे 2026

 

No comments:

विद्रुप राजकारण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- विद्रुप राजकारण विश्वासघातकी राजकारणाचा, आता पार कडेलोट होतो आहे. कुणीही कुणाला भेटला की, त्यातून संशयाच...