Monday, May 25, 2026

ऑपरेशन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
ऑपरेशन
फोडाफोडीच्या राजकारणाला,
ऑपरेशन असे गोंडस नाव आहे.
फोडणार नाही; फुटणार नाही,
सर्वांच्या तोंडावरती आव आहे.
फोडले जातात; फुटले जातात,
खटक्यावर खटके उडले जातात.
फुटणाराच्या पथ्यावरती,
राजकीय ऑपरेशन पडले जातात.
जसे कुणी गद्दार असतात,
तसे कोणी निष्ठा वाले असतात!
ऑपरेशन कोणतेही असले तरी,
त्याचे टाके मात्र सतत ओले असतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9287
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
25 मे 2026

 

No comments:

ऑपरेशन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- ऑपरेशन फोडाफोडीच्या राजकारणाला, ऑपरेशन असे गोंडस नाव आहे. फोडणार नाही; फुटणार नाही, सर्वांच्या तों...