Tuesday, May 12, 2026

देशभक्तीचे गोल्डन चान्स

आजची वात्रटिका
--------------------------
देशभक्तीचे गोल्डन चान्स
मेरे बहनो और भाईयो....,
आवाज ऐकून जरी लोक स्तब्ध आहेत.
तरी घाबरायचे काही कारण नाही,
देशभक्तीच्या नव्या संधी उपलब्ध आहेत.
पेट्रो सोडून मेट्रो कडे,
आपण आपला मोर्चा वळवायचा आहे.
झाला तो तळतळाट पुरे झाला,
गोडे तेलाला निर्णय कळवायचा आहे.
सोने खरेदी वाचवा; देश वाचवा,
देशभक्तीचे असे स्टान्स आहेत !!
एकाहून एक सरस असे,
देशभक्तीचे गोल्डन चान्स आहेत !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9274
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
12 मे 2026

 

No comments:

देशभक्तीचे गोल्डन चान्स

आजची वात्रटिका -------------------------- देशभक्तीचे गोल्डन चान्स मेरे बहनो और भाईयो...., आवाज ऐकून जरी लोक स्तब्ध आहेत. तरी घाबरायचे काही क...