Sunday, May 24, 2026

श्वानवृत्ती....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
श्वानवृत्ती
कुत्र्यापेक्षा शब्द पाळणे,
हल्ली अवघड होऊन बसले आहे.
ज्याचे शेपूट वाकडे नाही,
तुम्हीच सांगा ते कुत्रे कसले आहे?
शब्द पाळता आला नाही की,
दुसऱ्याची बाजू लंगडी केली जाते.
इमानदारी सोडून देऊन,
स्वभावाप्रमाणे वर तंगडी केली जाते.
इमानदारी असो वा वर तंगडी,
त्याच्याच तर नावाचा दाखला आहे !
गोंडा घोळण्यासाठी तर,
जो तो तुकड्यावारी सोकला आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9286
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
24 मे 2026

 

No comments:

श्वानवृत्ती....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- श्वानवृत्ती कुत्र्यापेक्षा शब्द पाळणे, हल्ली अवघड होऊन बसले आहे. ज्याचे शेपूट वाकडे नाही, तुम्हीच ...