Wednesday, May 20, 2026

लबाडीचे सत्य ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
लबाडीचे सत्य
लोक जेवढे मिंधे असतात,
तेवढेच लोक स्वार्थी असतात.
म्हणूनही कुठल्याही घोटाळ्याचे,
अनेक लोक लाभार्थी असतात.
एकमेकास सहाय्य करू म्हणीत,
एकत्रित फायदे लाटल्या जातात.
लबाडांना सज्जनतेची प्रमाणपत्रही,
लबाडांकडूनच वाटल्या जातात.
कोणताही लबाड लबाडाकडे,
कधीच लबाड म्हणून पाहत नाही !
शेवटी माकडीण आपल्या पिल्लाला,
पायाखाली घेतल्याशिवाय राहत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9282
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
20 मे 2026

 

No comments:

विद्रुप राजकारण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- विद्रुप राजकारण विश्वासघातकी राजकारणाचा, आता पार कडेलोट होतो आहे. कुणीही कुणाला भेटला की, त्यातून संशयाच...