Sunday, May 31, 2026

तास म्हणाला मिनिटाला

आजची वात्रटिका
--------------------------
तास म्हणाला मिनिटाला
सेकंद काटा बघ कसा,
जास्तच उड्या मारतो आहे.
कल्पना केली होती त्यापेक्षा,
जास्तच काड्या करतो आहे.
तो तरुण तुर्क,आपण म्हातारे अर्क,
तरी तेच सारखं सारखं आहे.
आपला पान उतारा करण्यात,
सेकंद काटा कायम गर्क आहे.
एक वेळेस दादागिरी बरी होती,
इथे तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे !
आपल्या सर्वांच्या अवहेलनेचे,
प्रिंट मिस्टेक हेच सार आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------,
फेरफटका- 9293
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
31 मे 2026

 

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...