Friday, July 16, 2021

अढळपद

आजची वात्रटिका
--------------------

अढळपद

भविष्यातील वाटचालीचा,
एक प्रश्न इतिहास जमा झाला.
भावी राष्ट्रपती पदाचा,
त्यांनी एकदाचा राजीनामा दिला.

आज हातात हात घेउन,
ताणलेले धनुष्यबाण आहेत!
भावी पंतप्रधान पदावर,
अजून तरी ते विराजमान आहेत!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6207
दैनिक पुण्यनगरी
16जुलै2021
 

No comments:

daily vatratika...29jane2026