आजची वात्रटिका
--------------------
कोरोनानुभव
कोरोना बिरोना काही नाही,
कोरोना म्हणजे थोतांड आहे.
गुरुजी पुन्हा बहकले,
कोरोना म्हणजे कुभांड आहे.
आंब्याचा अनुभव घेवू शकता,
पण कोरोनाचा अनुभव घेवू नका!
एखाद्याच्या भिडेखातर,
म्हातारचळावर विश्वास ठेवू नका !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269

No comments:
Post a Comment