Thursday, July 15, 2021

जखम

आजची वात्रटिका
--------------------

जखम

कधी फरफटत नेले जाते,
कधी गुपचूप जावे लागते.
नेत्यासाठी कार्यकर्त्यांना,
सक्तीचे बलिदान द्यावे लागते.

कार्यकर्त्यांना हाताशी धरून,
सगळे डाव हूकमी होतात
नेता जिंकतो किंवा हारतो,
कार्यकर्ते मात्र जखमी होतात!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6206
दैनिक पुण्यनगरी
15जुलै2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...