Friday, July 23, 2021

महापूर

आजची वात्रटिका
---------------------------

महापूर

माणसाने पात्रता सोडली की,
नद्या पात्राबाहेर येवू लागतात.
ज्या असतात जीवनदायिनी,
त्या माणसांचे बळी घेवू लागतात.

माणसाने आपली मर्यादा,
अगदी ठरवून पाळली पाहिजे!
आपली झाडा- झडती करून,
लव्हाळ्याची नम्रता कळली पाहिजे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6212
दैनिक पुण्यनगरी
23जुलै2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...