Thursday, July 29, 2021

अशी ही बनवाबनवी !

आजची वात्रटिका
---------------------

अशी ही बनवाबनवी !

पॉझिटिव बनावट आहे,
निगेटिव्हही बनावट आहे.
पेशंट वाढत चाललेत तरी,
सावधगिरीत घट आहे.

सॅनिटायझर बनावट आहे,
इंजेक्शनही बनावट आहे.
बनावट लसीकरणाचा,
अगदी स्वस्तामध्ये रेट आहे.

कुणाचा दावा कोरोना खरा,
कुणाचा दावा बनावट आहे!
कारोनाची चालली बनवाबनवी
कोरोनी मुरब्बी नट आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7659
दैनिक झुंजार नेता
29जुलै2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 8 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 309 वा l पाने -57

आजचा अंक दैनिक वात्रटिका l 8 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 309 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Xo0K3gNi...