Friday, July 30, 2021

नात्यांची उजळणी

आजची वात्रटिका
---------------------

नात्यांची उजळणी

जसे राजकारण कळण्यासाठी,
आपले ज्ञान पाजळावे लागते.
तसे राजकीय नातेसुद्धा,
अधून मधून उजळावे लागते.

राजकीय नाते काजळल्यामुळेच,
विसंवाद आणि आढेवेढे असतात!
राजकीय नात्यांच्या उजळणीचे,
राजकीय सोयीनुसार पाढे असतात!!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7662
दैनिक झुंजार नेता
30जुलै2021
------------------------

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...