Monday, July 19, 2021

झाडा-झडती

आजची वात्रटिका
--------------------

झाडा-झडती

मंत्र्यांचे 'गृह' फिरल्याने
घराचाही झाडा झाला.
संशयकल्लोळ वाढून,
सगळाच राडा झाला.

चोर म्हणतात पोलिसांना,
आम्ही रडावे की हसावे?
स्वप्नातही वाटले नव्हते,
मंत्री संत्री शेजारी असावे!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------
फेरफटका-7650
दैनिक झुंजार नेता
19जुलै2021

 

No comments:

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...