Thursday, July 1, 2021

वाजवा रे वाजवा !

आजची वात्रटिका --------------------- वाजवा रे वाजवा !

वाजवा म्हणलले की, वाजवू लागले,
फुका म्हटले की, फुकायला लागले.
जे ते आपले इमान,
अभिमानाने विकायला लागले.

सुपारीशिवाय वाजवू शकतो,
असा तर कुठलाच बँड नाही !!
ढोलक्या, तुणतुण्या आणि पिपाण्या,
यांना तर कसलाच स्टॅन्ड नाही!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7635
दैनिक झुंजार नेता
1 जुलै2021




No comments:

daily vatratika...3april2025