Thursday, July 22, 2021

ऐतिहासिक मंथन

आजची वात्रटिका
--------------------

ऐतिहासिक मंथन

इतिहास इतिहास असतो,
इतिहास पुराणातली वांगी नसतो .
जो ऐतिहासिक सत्य नाकारतो,
तो लबाड आणि ढोंगी असतो.

कधी कधी ऐतिहासिक तोल,
स्वार्थापोटी ढासळलेला जातो.
अस्सल पुराव्यांचे मंथन करून,
इतिहास नव्याने घुसळला जातो.

कुणाचेही ऐतिहासिक मंथन,
स्वार्थापोटी कधी अडवू नये !
स्वकीय असोत वा परकीय,
कुणाचाच इतिहास दडवू नये!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6212
दैनिक पुण्यनगरी
22जुलै2021

 

2 comments:

कोरोनाचे उपकार

आजची वात्रटिका --------------------------- कोरोनाचे उपकार सांगता येत नाहीत एवढे, कोरोनामुळे त्रास झाले. दहावीनंतर बारावीवालेही, परीक्षेशिव...