Tuesday, July 27, 2021

पाणीदारपणा

आजची वात्रटिका
---------------------

पाणीदारपणा

महापुरामुळे जसा हाहा:कार माजला,
तसा एक चमत्कारही होऊन गेला.
जणू न्यूज चॅनल्सवरचा कोरोना,
महापुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला.

किती पाणी घालायचे ?
किती पाणी सोडायचे?
यानिमित्ताने पुनर्विचार व्हायला हवा!
ओत पाणी, कर कालच्यावाणी,
हा पाणीदारपणा जायला हवा !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6216
दैनिक पुण्यनगरी
27जुलै2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...