Saturday, July 17, 2021

दहावीचा निकाल

आजची वात्रटिका
--------------------

दहावीचा निकाल

न झालेल्या परीक्षेचा,
अखेर निकाल आहे.
कुणासाठी योग्य आहे,
कुणासाठी बकाल आहे.

जशी परीक्षेची भीती नको,
तसा हुशारीचाही 'ग' नको.
विद्यार्थी विद्यार्थी असावा,
कुणी हुशार अगर 'ढ' नको.

आयुष्याच्या परीक्षेची,
अवस्था एकदम बत्थर आहे!
कोरोनाच्या गंभीर प्रश्नाला,
हे एक पर्यायी उत्तर आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6208
दैनिक पुण्यनगरी
17जुलै2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...