Saturday, July 3, 2021

एकमेकांस साह्य करू...

आजची वात्रटिका
---------------------------
एकमेकांस साह्य करू...
ऊस गोड लागला म्हणून म्हणून,
कारखान्यासकट खाल्ला जातो.
कुणी कल्पनाही करू शकत नाही,
इथ पर्यंत त्यांचा पल्ला जातो.
कुणी काय काय खावे?
प्रत्येकाचा खाजगी मामला आहे !
ठराविक घराण्यातच,
आपला सहकार रमला आहे!!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6194
दैनिक पुण्यनगरी
3जुलै2021

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...