Friday, July 9, 2021

फसवा-फसवी

आजची वात्रटिका
--------------------

फसवा-फसवी

त्यांच्या हसवा-हसवी साठी,
लोकांची फसवा-फसवी आहे.
सगळी नासवा-नासवी होते,
त्यांची नीतिमत्ता बाजारबसवी आहे.

ते हसतात,लोक फसतात,
त्यांचा नैतिकतेचा दावा असतो!
सगळ्याच बाजारबसव्यांना,
एकमेकांचा प्रचंड हेवा असतो!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6200
दैनिक पुण्यनगरी
9जुलै2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...