Wednesday, July 7, 2021

रुप-अभिरुप

आजची वात्रटिका
--------------------

रुप-अभिरुप

दोन दिवसीय अधिवेशन,
ट्वेंटी-ट्वेंटी सारखे गाजले.
आमदारांचे बारा वाजवून,
अधिवेशनाचे सूप वाजले.

कुणाला दाखवली पायरी,
कुणी आपली पायरी गाठली !
खर्‍याला खोटी विधानसभा,
पत्रकार कक्षात भेटली !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7640
दैनिक झुंजार नेता
7जुलै2021

 

No comments:

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...