Friday, July 23, 2021

कार्यकर्त्यांची देवघेव

आजची वात्रटिका
---------------------------

कार्यकर्त्यांची देवघेव

कार्यकर्ते नेत्यांचे वाढदिवस,
दणक्यात साजरे करत राहतात.
जे देवाकडून घेतले आहे
त्यातलेच देवालाच परत वाहतात.

ज्यांचे गुळ खोबरे असते,
त्यानेच त्यांचे चांगभले असते!
आरत्या आणि ओवाळणीला,
सुगीचे दिवस कुठून आले असते?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7654
दैनिक झुंजार नेता
23जुलै2021
--------------

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...