Sunday, July 25, 2021

पुनर्वसनाची परंपरा

आजची वात्रटिका
---------------------
पुनर्वसनाची परंपरा
लोक जगोत वा मरोत,
त्यांचा उद्धार रोखला जातो.
जो सत्तेवर येतो त्याच्याकडून,
कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनाचा
कार्यक्रम आखला जातो.
जनतेपेक्षा कार्यकर्त्यांचे,
पुनर्वसन वाजत गाजत असते !
पुनर्वसनाची ही परंपरा,
अगदी चढाओढीने रुजत असते!!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6214
दैनिक पुण्यनगरी
25जुलै2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...