Friday, July 9, 2021

अति तिथे माती

आजची वात्रटिका
--------------------

अति तिथे माती

पक्ष वेगवेगळे असले तरी,
त्यांचे सूर जुळलेले आहेत.
भूखंडांचे श्रीखंड,
अनेकांनी गिळलेले आहेत.

भूखंडांची गिळागिळी,
साधीसुधी नाही; अति आहे!
कितीही खाल्ले तरी,
त्याचा शेवट माती आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7642
दैनिक झुंजार नेता
9जुलै2021

 

No comments:

पोलखोल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- पोलखोल समाजकारणातले राजकारण, हळूहळू उघडे पडायला लागले. ज्याला जिथे जिथे दडता येईल, ते तिथे तिथे ...