Saturday, July 31, 2021

अरे तुरे नाही बरे !

आजची वात्रटिका
---------------------

अरे तुरे नाही बरे !

भल्या-भल्यांना चढते,
अशी सत्तेची नशा आहे.
म्हणूनच काहींच्या तोंडी,
अरे तुरे ची भाषा आहे.

अरेला कारे होवू शकते,
पण अरे तुरे बरे नाही !
नराचा नारायण व्हावा,
नाऱ्या होणे खरे नाही !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6221
दैनिक पुण्यनगरी
31जुलै2021

 

1 comment:

Unknown said...

Super चिमटा

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...