Thursday, July 8, 2021

पाहुणचार

आजची वात्रटिका
--------------------

पाहुणचार

मंत्रिमंडळाच्या विस्तारात,
समतोलाचा विचार केला जातो.
पक्षात आलेल्या पाहुण्यांचा,
प्रथम पाहुणचार केला जातो.

पाहुण्याच्या पाहुणचारात,
निष्ठावंत ताटकळत राहतात !
सगळी आग आग होवून,
आतल्या आत जळत राहतात!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6199
दैनिक पुण्यनगरी
8जुलै2021

 

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...