Monday, July 12, 2021

भन्नाट आयडिया

आजची वात्रटिका
--------------------

भन्नाट आयडिया

केंद्राने सहकार खाते काढले,
त्याचे कारण अगदी स्पष्ट आहे.
खाते निर्मितीची आयडिया तर,
जशी भन्नाट आहे,तशी बेस्ट आहे.

सहकाराचा मार्ग धरल्याशिवाय,
कुणाचीच कधी बरकत नाही!
आता राज्य सरकारनेही स्वतःची,
' ईडी ' काढायला हरकत नाही!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6203
दैनिक पुण्यनगरी
12जुलै2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...