Saturday, July 10, 2021

वाऱ्यावरची वरात

आजची वात्रटिका
--------------------

वाऱ्यावरची वरात

पतंगाच्या काटा-काटीच्या,
वावड्या उडायला लागल्या.
सहानुभूती बरोबरच,
रेवड्या उडायला लागल्या.

वावड्या आणि रेवड्या म्हणजे,
वाऱ्यावरची वरात असते !
गोत्यावर गोते खाल्ल्याची,
खंत प्रत्येकाच्या उरात असते!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6201
दैनिक पुण्यनगरी
10जुलै2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 8 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 309 वा l पाने -57

आजचा अंक दैनिक वात्रटिका l 8 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 309 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Xo0K3gNi...