Wednesday, July 7, 2021

लोकशाही रक्षक

आजची वात्रटिका
--------------------

लोकशाही रक्षक

यांनाही लोकशाही वाचवायचीआहे,
त्यांनाही लोकशाही वाचवायची आहे.
आपापल्या तालावरती,
सर्वांना लोकशाही नाचवायची आहे.

तथाकथित लोकशाही रक्षकांचा,
लोकशाही रक्षणाचा आव आहे!
वेळोवेळचा तमाशा बघितल्यावर,
शंका घेण्याला खूप मोठा वाव आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6198
दैनिक पुण्यनगरी
7जुलै2021

 

No comments:

ऑपरेशन तुडवा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- ऑपरेशन तुडवा जाणारा म्हणतो मी कडवा आहे, राहिलेला म्हणतो मीच कडवा आहे. ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून, आता म...