Sunday, July 4, 2021

घट-स्फोट

आजची वात्रटिका
---------------------

घट-स्फोट

दोन - दोन घटस्फोट घेणे.
हे काही गोरगरिबांचे काम नाही.
तुम्ही 'अमीर' असल्याशिवाय,
असल्या भानगडीत राम नाही.

फाउंडेशन मध्ये पाणी मुरतेय,
म्हणूनच आशेचा 'किरण' आहे ?
आपले आपण काय सांगावे राव?
आपले जाम तुंबलेले धरण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7638
दैनिक झुंजार नेता
4जुलै2021

 

No comments:

daily vatratika...3april2025