आजची वात्रटिका
--------------------
गोड बातमी
कैदी असले म्हणून काय झाले?
त्यांचेही नशिब फळफळणार आहे.
आता जेलमधील कैद्यांना,
मिष्टान्न भोजन मिळणार आहे.
या चमचमीत बातमीवर,
कैद्यांचा विश्वास कसा बसू शकतो?
कदाचित ईडी च्या चौकशीचाही,
हा चांगला परिणाम असू शकतो !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------
फेरफटका-7647
दैनिक झुंजार नेता
14जुलै2021

No comments:
Post a Comment