आजची वात्रटिका
---------------------
इंडियन पॉलिंपिक
ऑलिंपिक चार वर्षातून एकदा,
पॉलिंपिक मात्र नॉन स्टॉप असते.
ऑलिम्पिकची प्रतिष्ठा औरच,
पॉलिंपिक मात्र सडकछाप असते.
ऑलिम्पिकपेक्षाही अवघड खेळ,
पॉलिंपिकमध्ये खेळल्या जात आहेत!
नैतिक अनैतिक सगळ्या खेळ्या,
पॉलिंपिकमध्ये लोळल्या जात आहेत!!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6220
दैनिक पुण्यनगरी
30जुलै2021

No comments:
Post a Comment