Saturday, July 3, 2021

वादाचा मुद्दा

आजची वात्रटिका
---------------------

वादाचा मुद्दा

सौजन्य आणि शिष्टाचार,
राजकारणात उरला नाही.
एकमेकांचा उकांडा,
उकरायलाही पुरला नाही.

एकमेकांचे उकांडे उकरायचा,
प्रत्येकालाच नाद आहे !
तरीही त्यांचा दावा असतो,
हा आमचा वैचारिक वाद आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
फेरफटका-7637
दैनिक झुंजार नेता
3जुलै2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026