Saturday, July 31, 2021

कोरोनाचे स्वगत

आजची वात्रटिका
---------------------

कोरोनाचे स्वगत

माणसांना अद्दल घडली आहे,
हे मनापासून विसरत चला.
आपले निर्बंध शिथिल झालेत,
आता वाट्टेल तसे पसरत चला.

जगात तिसरी-चौथी लाट आली,
तरी भारतीय मनावर घेत नाहीत !
इथे तिसरी-चौथी लाट येईल कशी?
दुसऱ्याच लाटेला जाऊ देत नाहीत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...