Sunday, July 25, 2021

अरे देवा ss

आजची वात्रटिका
---------------------

अरे देवा ss

कोरोनातही पावला नाहीस,
महापुरातही धावला नाहीस.
दुःखाचे डोंगर कोसळतानाही,
चमत्कार काही दावला नाहीस.

मग डॉक्टर आणि सैनिकच,
तुझ्या ऐवजी धावून आले !
तू ऐनवेळी दगा दिल्याने,
आस्तिकही भांबावून गेले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7656
दैनिक झुंजार नेता
25जुलै2021

 



No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...