Monday, July 19, 2021

दमकोंडी

आजची वात्रटिका
--------------------

दमकोंडी

कोरोना जेवढा रगेल,
तेवढाच तो हट्टी आहे.
प्रत्येकाच्या नाकावर मास्क,
म्हणजे मुखपट्टी आहे.

जवळून कोणी गेले तरी,
अजिबात ओळखू येत नाही.
ज्याचे हवे त्याचे,
साधे मुखदर्शनही होत नाही.

ऑफलाईनची गंमत,
ऑनलाईनमध्ये जाणवत नाही!
आता सक्तीची मोबॅलिटीही,
अजिबात मानवत नाही!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6210
दैनिक पुण्यनगरी
19जुलै2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 305वा l पाने -57

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 305वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1VDZIPmnz1bKXOaj5nbZ...