Monday, May 27, 2019

शुभेच्छांचा हैदोस!व्हॉटसapp स्पेशल।वा।त्र।टि।का
----------------------------------- ---
शुभेच्छांचा हैदोस!
रोज नव्या दिवसाची
उत्साहाने उगवण असते.
वाढदिवस शुभेच्छांची
ग्रुप-ग्रुपवर हागवण असते.
256 सदस्य,365 वाढदिवस,
24x7 पोस्टींग सुरू असते.
देखल्या दिव्यांच्या प्रकाशात,
सहनशीलतेची टेस्टींग सुरू असते.
शुभेच्छा व्यक्तीगत द्याव्यात,
इतर पोस्टची कोंडी नको!
जिथल्या तिथे पाऊस पडावा,
ग्रुपवर मात्र बुळकांडी नको!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
#वात्रटिका
27मे2019
-------------------------------

No comments:

शेतकऱ्यांची लढाई

आजची वात्रटिका ----------------------- शेतकऱ्यांची लढाई आम्हीच शेकऱ्यांचे पाठीराखे, केवळ बढायावर बढाया आहेत. अनेक आघाड्यांवरती, शेतकऱ्यांच्...