Showing posts with label मंत्रिमंडळ विस्तार. Show all posts
Showing posts with label मंत्रिमंडळ विस्तार. Show all posts

Saturday, June 15, 2019

मंत्रिमंडळ विस्तार



आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
मंत्रिमंडळ विस्तार
अधूनमधून उडतात वावड्या,
कुणाचे पतंग काटल्या जातात.
कुणाला लागते लॉटरी,
कुणाला रेवड्या वाटल्या जातात.
कुणाच्या विरोधात कुंडली,
कुणाच्या बाजूने ग्रह-तारे असतात !
विस्ताराच्या पंचांगातले मुहूर्त, 
लवचिक आणि न्यारे असतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5478
दैनिक पुण्यनगरी
15जून2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

Monday, May 27, 2019

विस्ताराचा गर्भितार्थ


























आ।ज।ची।वा।त्र।टि।का
--------------------------------
विस्ताराचा गर्भितार्थ
विधानसभेचे दिवस भरण्यापूर्वीच
पाळणा हालण्याची चाहूल आहे.
मंत्रिमंडळ विस्तारासोबतच
उपमुख्यमंत्रीपदाचाही कौल आहे.
कुणाला लिफ्ट,कुणाला गिफ़्ट,
कुणाचा पुनर्वसनावर जीव आहे !
साडेचार वर्षातल्या फाडाफाडीची,
जमेल तेवढी शिवा-शीव आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5460
दैनिक पुण्यनगरी
27मे2019
------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्व वाचक,प्रेक्षक, अभिप्रायदार,शेअरकर्ते,सहमतीदार, असहमतीदार,अंशतः सहमतीदार आणि निव्वळ बघे या सर्वांचे पुन्हा एकदा आभार
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...