Showing posts with label फोन टॅपिंग. Show all posts
Showing posts with label फोन टॅपिंग. Show all posts

Wednesday, July 21, 2021

फोन टॅपिंग


 आजची वात्रटिका

--------------------


फोन टॅपिंग

नवरा आणि बायकोने,
एकमेकांचे फोन टॅप केले.
दोघांनाही वाटले नाही,
आपण काही पाप केले.

एकमेकांवरचा अविश्वास,
यातच तर सगळे होते!
दाखवायचे आणि वापरायचे,
दोघांचेही फोन वेगळे होते!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6211
दैनिक पुण्यनगरी
21जुलै2021

Saturday, January 25, 2020

फोन टॅपिंग

आजची वात्रटिका
-----------------------------------------
फोन टॅपिंग
नवरा बायकोकडून एकमेकांचा
रोजच्या रोज मोबाईल टॅप आहे.
दोघेही एकमेकांना बजावतात,
हे तर अघोरी पाप आहे .
टॅपिस्ट आणि पापिस्टांची
खरोखरच धन्य आहे !
असे कुणी दिसले तर त्यांना सांगा,
नेमके कोणते पुण्य आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5695
दैनिक पुण्यनगरी
25जानेवारी 2020

Tuesday, April 27, 2010

फोन टॅपिंग

***** आजची वात्रटिका ******
**********************

फोन टॅपिंग

नवरा-बायकोने एकमेकांचे
फोन कॉल टॅप केले.
दोघांनाही पश्चाताप झाला
आपण कुठून हे पाप केले?

डोळ्यात आणि कानात
चार बोटांचा गॅप असतो !
विकृत मनोवृत्तीला
संशयाचा शाप असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...