Thursday, June 24, 2021

दूरदृष्टी

आजची वात्रटिका
---------------------

दूरदृष्टी

या जनमीचे सोडून,
सात जन्माचे बघितले जाते.
ज्याचा एका जन्मात वैताग,
त्याला साता जन्मासाठी
दरवर्षी मागितले जाते.

कुणाची श्रध्दा जास्त,
कुणाची श्रध्दा कमी असते!
ज्या मागतात त्यांनाही खात्री,
त्याची शक्यता कमी असते !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6185
दैनिक पुण्यनगरी
24जून2021

No comments:

daily vatratika...29jane2026