Tuesday, June 8, 2021

जरा जपून

आजची वात्रटिका
---------------------

जरा जपून

लॉकचे अनलॉक झाले,
पण कोरोना गेला नाही.
तो दबा धरून आहे,
कोरोना काही मेला नाही.

स्वातंत्र्याचा आनंद घ्या,
पण त्यात शिस्त असू द्या,
मास्क आणि सोशल डिस्टंसिंगवर,
तुमची सर्व भिस्त असू द्या !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
फेरफटका-7614
दैनिक झुंजार नेता
8जून2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...