Showing posts with label मी पुन्हा येईल. Show all posts
Showing posts with label मी पुन्हा येईल. Show all posts

Friday, December 31, 2021

31 डिसेंबरचे मनोगत...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

31 डिसेंबरचे मनोगत

मी आधीच बदनाम आहे,
पुन्हा पुन्हा बदनाम करू नका.
ढोसायची तर खुशाल ढोसा,
माझ्या नावाने जाम भरू नका.

कडूपणाला गाडून साऱ्या
1 जानेवारी उगवला पाहिजे.,
शेवटचा दिस गोड व्हावा,
हा आशावाद जागवला पाहिजे.

मला गुडबाय केले तरी,
मी थोडाच जाणार आहे?
तुमचा ऐकायचा सराव झालाय,
मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल,
मी पुन्हा येणार आहे...!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6368
दैनिक पुण्यनगरी
31डिसेंबर2021

 

Tuesday, June 29, 2021

गर्जेल तो...…

आजची वात्रटिका
---------------------

गर्जेल तो...…

आधी म्हणाले,मी पुन्हा येईल,
मग म्हणाले,मी संन्यास घेईल.
राजकीय संन्यास घेतला तर,
पहिला संकल्प कसा पुरा होईल?

आत्मविश्वास की विसंगती?
हे ज्याला त्याला ज्ञात आहे!
ही बोलाचीच कढी ,
हा बोलाचाच भात आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6190
दैनिक पुण्यनगरी
29जून2021

 

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...