Showing posts with label ब्रेकींग न्यूज म्हणजे. Show all posts
Showing posts with label ब्रेकींग न्यूज म्हणजे. Show all posts

Thursday, August 18, 2022

बाजारगप्पा ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

बाजारगप्पा

अफवांचे पंख लावून,
बातम्या यायला लागल्या.
चक्क बाजारगप्पांच्या,
बातम्या व्हायला लागल्या.

ब्रेकींग न्यूज म्हणजे,
वावड्यावर वावड्या आहेत!
आपल्याच हाताने,
आपल्याच रेवड्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8017
दैनिक झुंजार नेता
18ऑगस्ट2022

 

Sunday, November 17, 2019

चॅनलचे दूर (दैव) दर्शन

आजची वात्रटिका
------------------------------------------
चॅनलचे दूर (दैव) दर्शन
ब्रेकींग न्यूज म्हणजे,
वावड्यावर वावड्या आहेत.
न्यूज चॅनल्स म्हणजे,
विडी फुक्यांच्या चावड्या आहेत.
सर्वात आधी,सर्वात पुढे,
हे वेड तर बघा केवढे आहे?
चावड्यावरच्या वावड्यांना,
' न्यूज व्हॅल्यू ' चे वावडे आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7123
दैनिक झुंजार नेता
17नोव्हेंबर2019

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...