आजची वात्रटिका
-------------------------
शाप आणि वरदान
कुणाची आगीतून फुफाट्यात,
कुणाची फुफाट्यातूनआगीत उडी आहे.
कुणाची चालली घर वापसी,
कुणाकडून घराचीच फोडाफोडी आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती,
हे सगळे महाभारत घडते आहे.
एकाचे पक्षातून बाहेर जाणे,
दुसऱ्याच्या पथ्यावरती पडते आहे.
दरवेळी निवडणूक आली की,
दरवेळी हे असेच होऊन जाते !
कुणाचे काही तरी घेऊन जाताना,
कुणाला काहीतरी देऊन जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8507
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
18मार्च2024
No comments:
Post a Comment