आजची वात्रटिका
-------------------------
सावधानता
महिला दिन आला की,
तीच उत्सव मूर्ती असते.
महिला दिना पुरती तरी,
कीर्ती आणि आरती असते.
एका दिवसाच्या आरतीला,
तीसुद्धा सहज बळी पडते.
स्वतःवरती हसताना,
तिच्या गाली खळी पडते.
एक दिवसीय कौतुकापासून,
तिने सावध राहायला हवे !
आठ मार्च पलीकडे अलीकडे,
तिने सतत पहायला हवे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8498
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
8मार्च2024
No comments:
Post a Comment