आजची वात्रटिका
-------------------------
लोकसभा तिकीट
कुणी कुणी तळ्यात आहे,
कुणी कुणी मळ्यात आहे.
हवे त्याला मिळत नाही,
नको त्याच्या गळ्यात आहे.
कुणाची चालली घालमेल,
कुणाचा राजकीय नखरा आहे.
ज्याचे त्याला कळून चुकले,
आपला बळीचा बकरा आहे.
कुणासाठी वरदान,
कुणासाठी साखरेची सुरी आहे !
ज्यांना दिल्लीची ॲलर्जी,
त्यांना आपली मुंबईच बरी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8503
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
13मार्च2024
No comments:
Post a Comment