Sunday, March 31, 2024

बंडोबा ते थंडोबा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बंडोबा ते थंडोबा

निवडणुकांच्या मोसमामध्येच
बंडोबांना कंड येऊ लागतात.
थोडे अंजारले गोंजारले की,
बंडोबाही थंड होऊ लागतात.

एक बंडोबा आखाडला की,
दुसरे बंडोबा आखडू लागतात.
पुराणातली वांगी,
बंडोबा नव्याने उकडू लागतात.

बंडोबांनी कितीही आव आणू द्या,
बंडोबा आंडोबा पांडोबा ठरतात !
बंडोबांनी कितीही ताव आणू द्या,
बंडोबा शेवटी थंडोबा ठरतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8519
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
31मार्च2024
 

No comments:

खाते वाटप ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- खाते वाटप कुणाला आवडीचे भेटले गेले, कुणाला नावडीचे भेटले गेले. जे जे बिन खात्याचे मंत्री होते, त्य...