आजची वात्रटिका
-------------------------
नो गॅरंटी
कोण कुणाच्या सोबत आहे?
कोण कोणाच्या विरोधात आहे?
कसलाच ताळाला मेळ नसल्याने,
सगळ्यांचे घोडे पेंड खात आहे.
आज आपण कुठे आहोत?
याचासुद्धा कूणाला पत्ता नाही.
उद्या आपण कुठे असूत?
याचीसुद्धा गॅरंटी आत्ता नाही.
उगीच कुणी सरळ वाट सोडून,
कुणी वाकडी वाट धरली नाही !
राजकारणाचीच राजकारणाला,
हल्ली तर मुळीच गॅरेंटी उरली नाही !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8501
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
11मार्च2024
No comments:
Post a Comment