आजची वात्रटिका
-------------------------
स्पॉन्सर्स जिंदाबाद !
क्रिकेट आणि राजकारण,
एकमेकात फिक्स आहे.
लोकसभा आणि आयपीएलचा,
डबल धमाका मिक्स आहे.
चौकार आणि षटकारांची,
दोन्हीकडेही बरसात आहे.
जनतेच्या तोंडी एकच वाक्य,
व्वा व्वा क्या बात आहे?
कुणी विजय;कुणी पराभव,
दणक्यात साजरे करत राहतात !
क्रिकेट आणि राजकारणात,
स्पॉन्सर्स गल्ले भरत राहतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8512
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
23मार्च2024
No comments:
Post a Comment