Showing posts with label स्पॉन्सर्स जिंदाबाद !. Show all posts
Showing posts with label स्पॉन्सर्स जिंदाबाद !. Show all posts

Saturday, March 23, 2024

स्पॉन्सर्स जिंदाबाद !...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

स्पॉन्सर्स जिंदाबाद !

क्रिकेट आणि राजकारण,
एकमेकात फिक्स आहे.
लोकसभा आणि आयपीएलचा,
डबल धमाका मिक्स आहे.

चौकार आणि षटकारांची,
दोन्हीकडेही बरसात आहे.
जनतेच्या तोंडी एकच वाक्य,
व्वा व्वा क्या बात आहे?

कुणी विजय;कुणी पराभव,
दणक्यात साजरे करत राहतात !
क्रिकेट आणि राजकारणात,
स्पॉन्सर्स गल्ले भरत राहतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8512
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
23मार्च2024
 

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...