आजची वात्रटिका
-------------------------
शॉक प्रूफ जनता
कुणाची चालली टिंगल टवाळी,
कुणाच्या जाहीर रेवड्या आहेत.
पहिला धक्का ओसरेपर्यंत,
नव्या भूकंपाच्या वावड्या आहेत.
जे जे दिवसा जमत नाही,
ते चक्क रात्री अपरात्री होते आहे.
राजकीय भूकंपाच्या वावड्यांची,
उदाहरणासहित खात्री होते आहे.
राज्यातल्या राजकीय भूकंपाचे,
अत्यंत विकृत असे रूप आहे !
आजकाल धक्केही नीट बसत नाहीत,
जनतासुद्धा आता शॉकप्रूफ आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8505
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
16मार्च2024
No comments:
Post a Comment